Sangli News Saam TV
महाराष्ट्र

Sangli News: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपची एन्ट्री; स्वबळाचा नारा देत उमेदवारी केली जाहीर

विजय पाटील

Rashtriya Samaj Paksha:

सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालिदास गाढवे हे उच्चशिक्षित तरुण आहेत. नुकतीच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणूक घडवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे.

माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT