Rashmi Thackeray performing Durgeshwari Aarti in Thane during Navratri, signaling a major political move against Eknath Shinde’s stronghold. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

Rashmi Thackeray Navratri Political Strategy: आता एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत... त्यामुळे शिंदेसेनेचं टेन्शन वाढलंय...मात्र रश्मी ठाकरेंनी ठाणं जिंकण्यासाठी कशी रणनीती आखलीय?

Bharat Mohalkar

महापालिकेच्या मोर्चेबांधणीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय.. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याची रणनीती आखलीय.. आणि त्याला निमित्त ठरलंय नवरात्रोत्सवात टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची आरती...

रश्मी ठाकरे फक्त दुर्गेश्वरीची आरती करुन थांबल्या नाहीत.. तर त्यानंतर ठाण्यातील विविध मंडळात देवीचं दर्शन घेत शिवसैनिकांशी संवाद साधलाय... मात्र रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीला पहिल्यांदाच गेल्या आहेत का?

2022

रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाक्याच्या देवीची आरती

2023

रश्मी ठाकरेंकडून देवीची पूजा

2024

रश्मी ठाकरेंनी देवीचं दर्शन घेतलं

शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना... असं बोललं जातं.. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय.. त्यामुळे शिंदेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित रणनीती आखलीय.. आधी उद्धव ठाकरेंनी ठाणे, कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.. तर राज ठाकरेंनीही कल्याण, अंबरनाथचा दौरा करुन वातावरण तापवलंय.. त्यातच आता रश्मी ठाकरेंनी ठाण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याने चर्चांना उधाण आलंय.. मात्र मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या रश्मी ठाकरे आता ठाकरेंच्या अस्तित्वाच्या लढाईत शिंदेंना बालेकिल्ल्यातच शह देण्यासाठी काय रणनीती आखणार आणि खरंच शिंदेंच्या हातातून ठाणे महापालिका जिंकणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT