शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही - रावसाहेब दानवे लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही - रावसाहेब दानवे

लक्ष्मण सोळुंके

जालना - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नांदेड-हडपसर-पूणे एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पहिल्याच किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. या रेल्वेमधून 350 टन कांदा आसाममध्ये रवाना करण्यात आला आहे. कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

शिवसेनेत मी आग लावत नसून त्यांच्यात आग लावण्याचं काम माझं नाही. रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये असं जरी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं तरी मनातली ईच्छा ते बोललेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते असून पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे असं दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 1 हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच दुहेरीकरण करणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती देखील दानवे यांनी दिली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गाचं दुहेरीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितले. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्व्ह करण्याचे काम सुरू आहे असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. तर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाच काम सुरू असून औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं असून आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल असंही दानवे यांनी सांगितलं.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT