''माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नाही'' Saam Tv
महाराष्ट्र

''माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नाही''

आज भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालन्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा जालना जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला.

लक्ष्मण सोळुंके

जालना: राजकिय नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात माञ मि सतत लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखं वागतो म्हणून सातत्याने ४० वर्ष एकही निवडणूक न हारता निवडून येतो असं सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्यांच्या सतत विजयी होण्याचं रहस्य उघड केलंय.

आज भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालन्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा जालना जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर ते आयोजित कार्यक्रमांत बोलत होते. निवडून आल्यानंतर अनेक नेत्यांच्या वागणुकीत आणि राहणीमानात बदल होतो, असं सांगत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी शुक्लकाष्ठ मागे लागू नये म्हणून हातात कुणाच्यातरी सांगण्यावरून हिरा, पन्ना आणि निलम या अंगठ्या घातल्या पण तरीही त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्याचं दानवे म्हणाले.

भागवत कराड मंत्रीमंडळात नवीन चेहरा असल्यानं त्यांच्या मांडव परतण्याचा कार्यक्रम सुरूय असं सांगत मि केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालोय असं सांगत माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नाही असं सांगत दानवे यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. मला कोळसा खातं मिळाल्यानं सकाळीच उठून मि तोंडावरून हात फिरवून गालाला तोंड काळं तर झालं नाही ना हे गालावरून हात फिरवून पाहतो असं सांगत मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत नसल्याचं ठासवून सांगितलं.

माझं मंत्रीपद जाणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्यानंतर अनेकांना गुदगुल्या झाल्याचां टोला देखील त्यांनी विरोधकांना हाणला. लोकांनी सातत्याने ३५ वर्ष निवडून दिलं नसतं तर माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

२०१९ च्या निवडणुकीत मि साडेतीन लाख मतांनी निवडून आलो असं सांगत त्यांनी निकालाच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र घेण्याआधी बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्याला कसे चिमटे काढले याचा किस्सा सांगितला तसेच आयुष्यात अशा कहाण्या खूप झाल्यात असं सांगत भाजप नेते बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टोलेबाजी करत त्यांचा समाचार घेतला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT