'दोन महिन्यांपासून कुठयं तो पठ्ठ्या'; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका Saam Tv
महाराष्ट्र

'दोन महिन्यांपासून कुठयं तो पठ्ठ्या'; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना त्यांची जीभ घसरली असल्याचे बघायला मिळाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत असताना त्यांची जीभ घसरली असल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत बोचरी टीका केली आहे. बिना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य (State) चालत असते का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या (election) प्रचाराकरिता आलेल्या रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर खोचक टीकास्त्र सोडले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रचार सभेमध्ये बोलत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (government) टीकास्त्र सोडले आहे.

हे देखील पहा-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा त्यांनी यावेळी वापर केला आहे. मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचे जबाबदार आहेत की १२ कोटी महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेचे?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी “२ महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी”, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली आहे. बिना मुख्यमंत्र्याचं कुठे राज्य चालत असत का?

या ३ महिन्यात कोणत्या शिवसेनेच्या (Shiv Sena) मंत्र्याला चार्ज दिला असता तर राज्याचा राज्य कारभार नीट चालला नसत का?”, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Prime Minister Narendra Modi) कौतुक केले आहे. कोरोना (Corona) काळामध्ये केंद्राप्रमाणे राज्याने देखील पॅकेज जाहीर करायला हवे होते.

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे. यावर विचारणा केली होती. देशात २- ३ वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यावर त्यांनी कोरोना काळामध्ये मोफत अन्न धान्य द्यावे अशी सूचना केली असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे. कोरोनाचे संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी असेही मोदी यांनी सांगितले होते, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT