Anup shah News, Ramraje Naik Nimbalkar News, Anup shah criticize Ramraje Naik Nimbalkar saam tv
महाराष्ट्र

रामराजेंचे राजकारण गलिच्छ! उदयनराजे, गोरे झाले आता रणजीतसिंह टार्गेट : शहा

'पोलिसांच्या मार्फत संपवायचं त्याची बदनामी करायची ही रामराजेंची जुनी सवय आहे'

ओंकार कदम

सातारा : ज्या राजवाड्यात बसून मालोजीराजेंनी (malojiraje) कोयना धरण (koyna dam) बांधण्यासारख्या विचारांना स्थान दिले. त्याच राजवाड्यात बसून कुटील कारस्थान करण्याचा डाव रामराजेंनी करणे निंदनीय आहे अशी टीका भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा (anup shah) यांनी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांच्यावर केली. तसेच मला बदनाम करण्याच्या प्रकरणात ठोस पुरावे आल्यावर बोलीन परंतु विरोधकांना पोलिसांच्या (police) मार्फत संपवायचं त्याची बदनामी करायची ही रामराजेंची जुनी सवय आहे आणि ती आम्ही गृहीत धरून चाललो आहे. आज हे प्रकरण झालं उद्या आणखी काही होईल अशी भावना माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांनी (phaltan) येथे रामराजेंबाबतच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली. (Ranjitsinh Naik Nimbalkar latest marathi news)

काही दिवसांपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांचेच निकटवर्तीय दिगंबर अगवणे यांनी अपहाराचे आरोप केले होते. या आरोपांवर बोलताना रणजितसिंह यांनी विधान परिषदेचे सभापती आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे निकटवर्तीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. रणजीतसिंह म्हणाले विरोधकांना पोलिसांच्या मार्फत संपवायचं त्याची बदनामी करायची ही रामराजेंची जुनी सवय आहे आणि ती आम्ही गृहीत धरून चाललो आहे.

दरम्यान फलटण पालिकेचे नगरसेवक अनुप शहा यांनी देखील रामराजेंवर टीका केली आहे. ते म्हणाले वास्तविक पाहता दिगंबर अगवणे हे मोहरे आहेत. याच्या पाठीमागे रामराजे नाईक निंबाळकर हे असून ज्या राजवाड्यात बसून मालोजीराजेंनी कोयना धरण बांधण्यासारख्या विचारांना स्थान दिले त्याच राजवाड्यात बसून कुटील कारस्थान करण्याचा डाव रामराजेंनी करणे निंदनीय आहे. रामराजेंची सभापतीपदाची जात असलेल्या खुर्चीच्या विचाराने ते असले गलिच्छ राजकारण खेळत आहेत. रामराजेंनी मागे उदयनराजे आणि जयकुमार गोरे यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते नेहमी तोंडावर पडले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT