ऐकलंत... मंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात जाऊन थेट निलेश राणेंनी कणकवली नगरपंचायत जिंकण्याचा निर्धार केलाय.. त्यामुळे कोकणात भाजपचे राणे विरुद्ध शिंदेसेनेचे राणे आमने-सामने आलेत... मात्र कोकणातील समीकरण नेमकं कसं आहे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 नगरपरिषद तर 1 नगरपंचायतची निवडणूक
वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवणमध्ये स्वबळावर लढत
कणकवलीत शिंदेसेनेचा शहर विकास आघाडीला पाठींबा तर भाजप स्वबळावर
विधानसभेला नितेश राणेंना आव्हान देणाऱ्या संदेश पारकर यांना निलेश राणेंचा पाठींबा
खरंतर ठाकरेसेनेच्या संदेश पारकर यांनी शहर विकास आघाडी स्थापन केलीय.. त्याला शिंदेसेनेनं पाठींबा दिलाय.. तर नितेश राणेंनी एकला चलोचा नारा दिलाय.. त्यामुळे दोन्ही भाऊ आमने-सामने आले असले तरी निलेश राणे 100 टक्के योग्य आहेत, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय.. तर आपण शहर विकास आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय नारायण राणे आणि एकनाथ शिंदेंना विचारुन घेतल्याचं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय.
खरंतर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला... मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने ठाकरेंच्या बालेकिल्लाच जिंकला...एवढंच नाही तर कोकणातील 15 जागांपैकी 8 जागांवर शिंदेसेना, 4 जागांवर भाजप, तर 2 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि 1 जागेवर ठाकरेसेनेनं विजय मिळवला..
कोकणात शिंदेसेना वरचढ असतानाही भाजप शिंदेंचा प्रभाव मान्य करण्यास तयार नाही...त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेनेनं स्वबळाचा नारा दिलाय.. आता राणे बंधू एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानं कणकवलीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे बाजी मारणार की निलेश राणेंनी पाठींबा दिलेले संदेश पारकर... याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र कणकवलीतील लढाईत कोणते राणे बाजी मारणार याचीच उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.