Rana Couple
Rana Couple Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री राज्यात शनी म्हणून बसलेत; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि पती रवी राणा आज नागपूर येथील रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण केले. आजच राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात आज आंदोलन होते. दोन्ही चालीसा पठणाला आज पोलिसांनी परवानगी दिली होती. (Navneet Rana Latest News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि विदर्भातील समस्यांशी काही घेणेदेणे नाही. राज्यातील असंख्य समस्या दूर व्हाव्यात म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहे. या सरकारला हनुमान चालीसा पठणाची इतकी ऍलर्जी का हा प्रश्न आहे, असंही राणा म्हणाले.

हे देखील पाहा

राणा दाम्पत्याने विमानतळ ते रामनगरपर्यंत बाइक रॅलीसाठी परवानगी मागितली होती, ती पोलिसांनी फेटाळून लावली. त्याचबरोबर हनुमान चालीसाला (Hanuman Chalisa) अटींसह परवानगी देण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल, अशीही अट घालण्यात आली होती.

राणा दाम्पत्यांनी नागपूर विमानतळावरुन येत मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. विमानतळ ते मंदिर राणा दाम्पत्याने रॅली काढली. यावेळी राणा यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावळे राणा दाम्पत्यानी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

या दोन्ही पठणाला लाऊडस्पीकरचा वापर करू देणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सुमारे एक हजार कार्यकर्ते रामनगर येथील मंदिरात बारा वाजण्याच्या सुमारास जमून हनुमान चालीसाचे पठण केले. राणा दाम्पत्याने पुस्तकाशिवाय हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हाण त्यांनी केले होते. (Navneet Rana Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

SCROLL FOR NEXT