आठ वर्षात देशवासियांची मान कोणापुढे झुकू दिली नाही: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत.
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiSaam Tv
Published On

राजकोट: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींच्याहस्ते राजकोट येथील अटकोट येथे मातोश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. 'ज्यावेळी लोकांच्या प्रयत्नांना सरकारची जोड मिळते, त्यावेळी आम्हाला काम करण्याची ताकद मिळते. यावेळी त्यांनी मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले. (Pm Narendra Modi Latest News)

Pm Narendra Modi
कोरोनानं टेन्शन वाढवलं; मास्कसक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं सूचक विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले, या सरकारच्या आठ वर्षाच्या काळात आम्ही कोणतेच असं कोम केलं नाही, ज्याने लोकांची मान खाली जाईल. ६ कोटी कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गरिबांचा सन्मान राखला आहे. यासोबतच ३ कोटींहून अधिक गरिबांना घरे देण्यात आली. अडचणीच्या काळात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. जेव्हा कोरोनाच्या काळात उपचारांची गरज वाढली तेव्हा आम्ही चाचणी वाढवली. जेव्हा लसीची गरज भासली तेव्हा ती मोफत दिली.

Pm Narendra Modi
उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांनी थेट रुग्णालय फोडलं, नाशिकमधील धक्कादायक घटना

'आम्ही गरीबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण याला प्राधान्य दिले. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला अनुसरून आपण देशाच्या विकासाला नवी गती दिली. आज जेव्हा मी गुजरातच्या भूमीवर आलो आहे, तेव्हा मला माथा टेकून गुजरातच्या सर्व नागरिकांचा आदर करावासा वाटतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. मी दिलेले संस्कार आणि शिक्षणामुळे मातृभूमीच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही, समाजासाठी कसे जगायचे हे शिकवले, असंही नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले.

पंतप्रधानांनी अटकोट, राजकोट येथे नव्याने बांधलेल्या मातुश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. ४० कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय बांधण्यात आले आहे. येथे लोकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com