Nagpur News Toay: आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच आता राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत तर लोकसभा निवडणुकीच्या अनुंषंगाने बैठकाही सुरु झाल्या आहेत. त्यातच आता रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले आहेत. (Latest Marathi News)
या ठिकाणी आधी राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता काँग्रेसकडूनही पक्षाच्या ताकदीचा आढावा घेणे सुरू आहे.
रामटेक (Ramtek)लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाने नाही तर काँग्रेसने (Congress) लढावावी, असा आग्रह मुंबईतील झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी केला. लोकसभा निवडणूक पूर्वतयारी बैठकीत रामटेकच्या जागेसाठी नेत्यांचा आग्रह असल्याने, पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. (Political News)
या मागणीनंतर ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी काँग्रेसला डिवचलंय. “रामटेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस संभ्रम निर्माण करत आहे. पराभव होण्यापेक्षा रामटेकचा आग्रह सोडा. रामटेक लोकसभा आणि विधानसभा बाळासाहेब ठाकरे यांच्या आस्थेचा विषय आहे, शिवसैनीक आस्थेसोबत बेईमानी होऊ देणार नाही” असं गोडबोले म्हणाले.
“काहीही झालं तरी चालेल पण रामटेक लोकसभा आणि रामटेक विधानसभा आम्ही कदापीही काग्रेसला सोडणार नाही” असंही ते म्हणाले. त्यामुळे आता रामटेकच्या जागेवरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.