Ramraje Naik Nimbalkar News Saam tv
महाराष्ट्र

Ramraje Naik Nimbalkar: अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर मैदानात; संवाद बैठकीदरम्यान घेतली भीष्म प्रतिज्ञा

Ramraje Naik Nimbalkar News: बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भीष्म प्रतिज्ञाच घेतली.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Ramraje Naik Nimbalkar News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी माजी सभापती रामराजे मैदानात उडी घेतली आहे. दहिवडीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर दहीवडीतच अजित पवार गटाची संवाद बैठक झाली. या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भीष्म प्रतिज्ञाच घेतली. (Latest Marathi News)

साताऱ्यातील दहिवडी मध्ये शरद पवार यांचा संवाद मेळावा पार पडला. या वेळी दहिवडीमध्ये शरद पवार यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत देखील केले.

हा मेळावा झाल्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती एकेकाळी शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारे आणि सध्या अजित पवार यांच्या गटात असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी मान खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली. रामराजे यांनी दहिवडीमध्येच संवाद बैठक आयोजित केली.

या बैठकीमध्ये त्यांनी मान खटाव भागातील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी काय आहेत याचा आढावा घेतला. एवढेच नव्हे तर या बैठकीनंतर बोलत असताना रामराजे म्हणाले, शरद पवारांनी आम्हाला विकासाच राजकारण शिकवलं आणि भविष्यातला विकास सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला हा क्लेशदायक निर्णय घ्यावा लागला'.

'भविष्याचा विचार केला तर आम्हाला अजितदादा यांच्याशिवाय महाराष्ट्रात मोठा दुसरा कोणताही नेता दिसत नाही, जो आपल्या महाराष्ट्राला एकविसाव्या शतकातील प्रमुख राज्य बनून ठेवेल. त्यामुळे 1999 ला ज्याप्रमाणे आम्ही शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी स्वप्न बघितलं तसेच अजित दादांना आज ना उद्या योग्य वेळी मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भीष्म प्रतिज्ञाच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत काय? वाचा सविस्तर

रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का; सरपंचपदाच्या निवडणुकीत सख्ख्या भावाचा दारुण पराभव

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Genelia Deshmukh-Raja Shivaji : जिनिलिया देशमुख ते सायली संजीव, कोण कोणत्या अभिनेत्रींनी साकारली महाराणी सईबाईंची भूमिका?

पुणेकरांसाठी Good News! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी होणार सुरू, १२ स्थानकांची नावेही समोर, वाचा

SCROLL FOR NEXT