Ramesh Chennithala Clarifies MNS Role saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मनसे-शिवसेनेची टाळी वाजली; पण राज ठाकरेंसाठी आघाडीची दारे अजून बदंच!

Ramesh Chennithala Clarifies MNS Role: पुण्यात संपन्न झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत रमेश चैनिथल्ला यांनी मविआ आणि मनसेबाबत मोठं विधान केलंय. राज ठाकरे अजून महाविकास आघाडीचे भाग नसल्याचं चैनिथल्ला म्हणालेत.

Bharat Jadhav

  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीबाबत चर्चा रंगली

  • काँग्रेसने मनसे आघाडीत नसल्याचं स्पष्ट केलं

  • राहुल गांधींनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला

  • पुण्यात काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळा पार पडली

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुढील निवडणुका एकत्र लढवतील अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंसोबत युती झाल्यानंतरही मनसेसाठी आघाडीचे दरवाजे अजून बंद आहेत. राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला म्हणालेत. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मतांच्या चोरीच्या आरोपावरून निवडणूक आयोग आणि मोदी सरकारला लक्ष्य केलंय. तर राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यापार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून मोर्चोबांधणी सुरू झालीय.

स्थानिक पातळीवर बैठकांचा धडका लावलाय. पुण्यात काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळा घेण्यात आली. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी रमेश चैनिथला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत विधान केलं.

आगामी निवडणुकीत आघाडीबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही. मात्र, राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, असे रमेश चैनिथला यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात दोन्ही भावांनी सरकारविरोधात दंड थोपटले होते.

त्यानंतर विजयी मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र आले होते. दोन्ही बंधूंची मने जुळल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका महायुतीला आव्हानात्मक ठरतील, असं ठाकरे गटासोबत युती झाल्यानंतर राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होतील अशी चर्चा सुरू झालीय. मात्र त्यांच्यासाठी मविआची दारे अजून बंद असल्याचं दिसत आहे.

आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होणार नाही, असेही रमेश चैनिथला यांनी या कार्यशाळेच्या समारोपावेळी म्हणाले. आघाडीबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ. तसेच दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही. मात्र राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, असे रमेश चैनिथला यांनी म्हटलंय.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आहे. जोपर्यंत मोदी राहतील तोपर्यंत देशात स्वतंत्र राहणार नाही. विधानसभा निवडणुकांबाबत सगळ्यात पहिले महाराष्ट्र राज्याने आवाज उठवला होता. मतांच्या यादीत घोळ करून महाराष्ट्र आणि हरियाणामधील सत्ता भाजपने घेतलीय. मतदार याद्यात घोळ केला, त्यामुळे जोपर्यंत मोदी शाह सत्तेत आहेत. ते आहेत तोपर्यंत देशात मोकळ्या भीतीमुक्त निवडणुका होणार नाहीत, असे चैनिथला यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT