Pankaj Tadas
Pankaj Tadas  Saam tv
महाराष्ट्र

Pankaj Tadas : सर्व आरोप चुकीचे, मला हनीट्रॅपमध्ये फसविण्यात आलं; पत्नीच्या आरोपानंतर पंकज तडस यांची पहिली प्रतिक्रिया

साम टिव्ही

Pankaj Tadas News :

वर्ध्यातील लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या घरातील कौटुंबीक वाद उफाळून आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान रामदास तडस यांच्या सुनेने त्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेतील गंभीर आरोपावर पंकज तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी भरपत्रकार परिषदेत कौटुंबीक छळाचा आरोप त्यांच्या पतीवर केला. यावेळी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. पत्नी पूजा तडस यांच्या आरोपावर पती पंकज तडस म्हणाले की, 'सुसंकृत लोक पहिले घराचा तमाशा बाहेर काढत नाही. सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली, त्या कोणत्या पक्षाच्या आहेत. यात राजकारण का घुसलं? पत्नीने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. मला हनीट्रॅमध्ये फसविण्यात आलं होतं. याबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे. हेतूपूरस्पर करण्यात आले होते'.

'न्यायलयात हजर राहण्यासाठी वेळ नाही. पण मीडियासमोर बोलायला वेळ आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर मी जास्त बोलणार नाही. सुषमा अंधारे यांच्या बुद्धीत अंधार आहे. स्वतःच्या घरातील अंधार अंधारे पाहू शकत नाही. या प्रकरणाचे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, असे तडस पुढे म्हणाले.

रामदास तडस यांनी काय प्रतिक्रिया दिली?

रामदास तडस यांनी सुनेच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'सदर प्ररकरण २०२० चा आहे. त्यावेळेस मला माहिती नव्हतं. काही लोकांनी त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला भडकवून मला पैशांची मागणी करायला लावली. विरोधकांजवळ कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे हे प्रकरण उकरुन काढलं आहे. हे दोघेजण चांगले राहावे, यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण त्यांचा वाद झाला. दोघेही कोर्टात गेले. माझ्या मुलाला मारण्याचा तिचा प्रयत्न होता'.

'तो जो फ्लॅट आहे, अजून तिच्या जवळ आहे. ती अजून तिथेच राहते. त्यांची कोर्टामध्ये केस सुरू आहे. ते दोघे एकत्र आले, तर मी बाप म्हणून स्वीकारेल. डीएनए टेस्टची मागणी दोघांनी केली होती. जेव्हा कोर्ट निकाल देईल ते समोर येईल. माझी उमेदवारी रद्द करावी हे विभागांचे षडयंत्र आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे. त्यामुळे हे षडयंत्र असलं आहे. ते दोघे एकत्र आले तर, मी स्वीकारायला तयार आहे, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT