Uddhav thackeray News Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : 'उद्धव ठाकरे कधीच सत्तेत येणार नाहीत'

Uddhav thackeray Latest news : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार रामदास कदम यांनी घेतला. 'उद्धव ठाकरे कधीच सत्तेत येणार नाहीत, असा दावा रामदास कदम यांनी केला.

अमोल कलये

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात पुन्हा सत्तेवर येऊ, असा निर्धार व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे कधीच सत्तेत येणार नाहीत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना रामदास कदम म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना टीका करण्याचेच काम आहे. भविष्यात कधीच सत्तेत येणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतील. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना किती निधी दिला हे ते सांगू शकत नाहीत'.

' उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? बजेट पक्षाचे नसते. उद्धव ठाकरेंचा टीका करण्याचा धंदा सुरू राहुदेत. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं. 'भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. कर्नाटकामध्ये जाऊन मराठी किंवा हिंदी बोलून दाखवा. तिथे बोलता येत नसेल तर मुंबईत इतर भाषा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लाडकी बहीण योजनेवर रामदास कदम यांनी भाष्य केलं. रामदास कदम म्हणाले, 'बजेट डोळ्यासमोर ठेऊन योजना राबवाव्या लागतात. लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील. अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात'. संजय कदम यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना रामदास कदम म्हणाले, 'संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते पक्षात येणार असतील, तर मी पायघड्या घालेन'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सर्वोच्च सुनावणी

Guru Nakshatra Gochar 2026: १२ तासांत ३ राशींचं नशीब बदलणार, नशीब पलटणार अन् पैशांचा पाऊस पडणार

Bangalore real estate: २०२० मध्ये फ्लॅटऐवजी ३० लाखांची कार घेतली, आता होतेय पश्चाताप; घराची किंमत वाचून तुम्हालाही बसेल झटका

मध्यरात्री 26 IAS अन् 53 RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठा भूकंप

Shocking : महाराष्ट्र हादरला! १७ वर्षीय दृष्टिहीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT