Bangalore real estate: २०२० मध्ये फ्लॅटऐवजी ३० लाखांची कार घेतली, आता होतेय पश्चाताप; घराची किंमत वाचून तुम्हालाही बसेल झटका

Surabhi Jayashree Jagdish

2020 मध्ये 1 BHK खरेदीची संधी

That_Driver9237 नावाच्या Reddit युजरने r/BangaloreRealEstates वर आपला अनुभव शेअर केलाय. त्याच्या पोस्टनुसार, सुमारे सहा वर्षांपूर्वी ते बेंगळुरूमध्ये 1 BHK घरात भाड्याने राहत होते आणि त्याच घराच्या मालकाकडून ते घर खरेदी करण्याची ऑफर त्यांना मिळाली होती. त्यावेळी त्याचं वय 26 वर्षे होतं आणि फ्लॅटची किंमत 30 लाख रुपये सांगण्यात आली होती.

Bangalore property price | saam tv

घराऐवजी कार घेण्याचा निर्णय

त्या वेळी 30 लाख रुपये खर्च करून घर घेण्यापेक्षा कार खरेदी करणे त्यांना अधिक योग्य वाटलं. त्यामुळे त्यांनी 1 BHK फ्लॅटची ऑफर नाकारली आणि घर खरेदी करण्याची संधी सोडून दिली. त्या निर्णयाचा फारसा परिणाम त्यावेळी जाणवला नाही. मात्र आता त्यांना तो निर्णय चुकीचा ठरल्याचे वाटत आहे.

Bangalore real estate prices | saam tv

त्याच फ्लॅटची किंमत 90 लाखांपर्यंत

काही दिवसांपूर्वी ते त्याच परिसरात एका मित्राच्या घरी गेले असताना त्यांनी 1 BHK घराच्या सध्याच्या किमतीबद्दल माहिती घेतली. त्यांना त्या घराची किंमत तब्बल 90 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं. म्हणजेच 2020 मध्ये 30 लाख रुपयांना उपलब्ध असलेल्या घराची किंमत आता सुमारे 60 लाख रुपयांनी वाढल्याचं समजलं.

1 BHK flat in Bangalore | saam tv

घरमालक विक्री करण्यास तयार नाहीत

या वाढलेल्या किमतीमुळे बंगळुरूमधील काही घरमालकांना आपली मालमत्ता विकण्यापेक्षा ती भाड्याने देणं अधिक फायदेशीर वाटतंय. घरातून नियमित भाडे मिळत असल्याने मालमत्ता विकण्याची गरज अनेकांना वाटत नाही.

Bengaluru rental market | saam tv

2018 मध्ये घर घेतलेल्या व्यक्तीचा अनुभव

Reddit पोस्टवरील एका युजरने सांगितलं की, त्याने 2018 मध्येच घर खरेदी केलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांत त्याची EMI पूर्ण होईल, तर त्याच परिसरातील शेजारी आजही त्या घरासाठी सुमारे 40 हजार रुपये दर महिन्याला भाडं देतायत. त्यामुळे घर खरेदी केल्याचा दीर्घकालीन आर्थिक फायदा झाल्याचे त्याला वाटते.

Bengaluru flat price | saam tv

भाड्याचं उत्पन्न

बंगळुरूमध्ये घरांच्या वाढत्या किमतीसोबतच भाड्याच्या उत्पन्नाकडेही लोकांचं लक्ष वाढलंय. काही Reddit युजर्सनी शहरातील घरांमधून मिळणारे भाडं तुलनेने अधिक असल्याचं त्यांच्या अनुभवातून सांगितलं.

Bengaluru rent vs buy | saam tv

पूर्वी घेतलेल्या निर्णयाची खंत

That_Driver9237 यांच्या अनुभवात 30 लाख रुपयांचा फ्लॅट न घेण्याचा निर्णय आणि त्याच घराची आता 90 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेली संभाव्य किंमत हा मुख्य मुद्दा आहे. त्या काळात कार खरेदीला प्राधान्य दिलं असलं तरी आजच्या बाजारभावाकडे पाहताना त्यांना मोठी आर्थिक संधी हातातून गेल्याचं जाणवतंय.

Bangalore housing demand | saam tv