Ashish Shelar On Uddhav Thackeray: 'आंदोलनात तुम्ही कुठे होता? 'बाबरी'वरील मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा ठाकरेंना सवाल

Ashish Shelar News: उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Ashish Shelar and uddhav Thackeray
Ashish Shelar and uddhav Thackeray saam tv
Published On

Ashish Shelar News: मंत्री चंद्रकांत पाटील यांचं 'बाबरी' मशिदीवरील एका वक्तव्याने राजकारण तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार म्हणाले, ' चंद्रकांत दादा यांनी विधान केलं नसतं तर बरं झालं असतं. ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे. मंदिर निर्माण करण्याच्या आंदोलनात कोण होतं हे विचारायचे असेल, तर थेट उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे की, आंदोलनात तुम्ही कुठे होता? हवेचे बुडबुडे काढण्याचे उद्योग बंद करा'.

Ashish Shelar and uddhav Thackeray
Rozgar Mela: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 71 हजार तरुणांना देणार नियुक्तीपत्र

आशिष शेलार पुढे म्हणाले, 'जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा तुम्ही घरात होता. आता प्रश्न विचारत आहात. आता पण घरातच आहात. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी अभियान सुरू केले. त्यांचे योगदान आणि भूमिका मोठी होती. तुम्ही गांधीधारी आहात की सावरकरधारी यांचे उत्तर द्या'.

'चंद्रकांत दादांनी वक्तव्य केले नसते तर बरं झालं असतं. तेव्हाच भूमिका होती की सकल हिंदू एकत्र आले पाहीजे. बाळासाहेबांची भूमिका योगदान वातावरण निर्मिती मोठं आहे. आजही उद्धव ठाकरे यांच्या भूमिका हिंदू एकतेला विघटन निर्माण करणाऱ्या आहेत. हिंदू एकत्र आला तर उद्धव ठाकरेंच्या पोटात का दुखतं ? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केला.

Ashish Shelar and uddhav Thackeray
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : लाज तुम्हालाच वाटली पाहिजे; संजय सिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

'पूर्वी हिंदुत्वासाठी दार उघड बये दार ही भूमिका घ्यावी लागत होती. पण आता उद्धव ठाकरेंना वेगवेगळ्या पक्षांचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. त्यांनी हिंदुत्व सोडले नसते तर दरवाजे ठोठावण्याची वेळ आली नसती, असा टोला देखील शेलार यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com