Ramdas Kadam, Barsu Refinery, Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Ramdas Kadam News : शरद पवारांना बाप म्हणता ना, त्यांच्याकडून काही तरी शिका : उद्धव ठाकरेंना रामदास कदमांचा सल्ला

येत्या काही काळात उद्धव ठाकरे हे बारसूचा दाैरा करणार आहेत.

Siddharth Latkar

- जितेश कोळी

Ramdas Kadam News : महाविकास आघाडीच्या सभेत शिंदे - फडणवीस सरकारवर टीका करतानाच आपल्या बारसू रिफायनरी दौऱ्याची घोषणा केलेल्या उद्धव ठाकरेंचा शिवसेना नेते रामदास कदम यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बारसुला रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच प्रस्ताव पाठवला आणि आता बारसुला जाऊन लोकांना भडकवायचं काम देखील उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे दुतोंडी साप आहेत अशी टीका रामदास कदम (ramdas kadam) यांनी केली. (Maharashtra News)

रामदास कदम म्हणाले उद्धव ठाकरे यांचा दुतोंडीपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे बारसू येथे गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या तोंडावर लोक थुकतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन वेळाच विधानसभेत गेले ही माहिती शरद पवार यांनी माध्यमांवर सांगितली आहे.

त्यामुळे ज्यांना बाप म्हणताय त्यांच्याकडून काही तरी शिका असा सल्ला देखील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा म्हणजे फक्त गद्दार गद्दार म्हणण्यासाठी ओरड असून या थयथयाटाला जनता भीक घालणार नाही असेही रामदास कदम यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे हे बारसूच्या दौऱ्यावर येणार आहेत असे समजते. बारसू म्हणजे काय तुम्हांला चौपाटी वाटली का, काय पिकनिकला जाताय का असा सवाल रामदास कदम यांनी ठाकरेंना विचारला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT