Ramdas Kadam On Aaditya Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Kadam On Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची टीका करण्याची पात्रता नाही; रामदास कदम यांचा हल्लाबोल

आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे

Vishal Gangurde

जितेश कोळी

Ramdas Kadam News: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा व बाळासाहेब ठाकरे यांचा नातू एवढीच आदित्य ठाकरे यांची ओळख असून त्यापलीकडे त्यांची कोणतीच ओळख नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची टीका करण्याची पात्रता नाही, अशी विखारी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या सभेत शिंदे गटावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. रामदास कदम म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद तर अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रिपद व अर्थ खाते गेल्याने सध्या त्यांचा थयथयाट सुरू आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना गुळाचा मुख्यमंत्री बनवून राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोट्यवधींचा निधी दिला. त्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले'.

'निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत, पण ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाहीत, असा सवाल करत दुसऱ्याकडे एक बोट केले, तर चार बोटे आपल्याकडे दाखवत असतात, याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असा सल्ला रामदास कदम यांनी यावेळी दिला.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, हे पहावे लागणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Recipe : विकत कशाला? घरीच १० मिनिटांत बनवा हेल्दी चीज

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Amitabh Bachchan : मुंबईत पावसाचा हाहाकार; बिग बींच्या बंगल्यातही शिरले पाणी, पाहा व्हायरल VIDEO

Mumbai Local Update : पावसाचा मुंबई लोकलला फटका; हार्बर, मध्य रेल्वे २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे मेगा हाल

Pune School Holiday: पुण्यातील घाटमाथ्याच्या शाळांना आज सुट्टी, परिसराला रेड अलर्ट; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT