Ramdas Athawale on Raj Thackeray, Ramdas Athawale News Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale : राज ठाकरेंसोबत युती करणं भाजपला महागात पडेल; आठवलेंचा इशारा

'राज ठाकरे यांच्यासोबत युती करणं भाजपला महागात पडेल'

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Ramdas Athavale News : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि 'रिपाई'चे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुन्हा एकदा भाजप-मनसे यांच्यातील वाढत्या जवळीकीविषयी नापसंती व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांचा युतीला कुठलाही फायदा होणार नाही, त्यांना युतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरे यांच्यासोबत युती करणं भाजपला महागात पडेल, असा इशारा रामदास आठवले यांनी भाजपला (BJP) दिलाय. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. (Ramdas Athawale vs Raj Thackeray)

काय म्हणाले रामदास आठवले?

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. रामदास आठवले यांनी मनसे-भाजप युतीबाबत विरोधही दर्शविला. 'राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निळा, हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा फायदा युतीला काहीच होणार नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करायला नको, असं मत आठवले यांनी मांडलं आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, मनसेसोबत युती केल्याने भाजपला फायदा कमी नुकसानच जास्त सहन करावं लागेल, त्यामुळे आमचा मनसेसोबतच्या युतीला विरोध आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (Ramdas Athawale Todays News)

राहुल गांधींवर आठवलेंची टीका

दरम्यान, यावेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानावरही टीका केली. 60 वर्षात ज्या काँग्रेसला भारत जोडता आला नाही, आता राहुल गांधी यांना काय भारत जोडता येणार असा टोलाही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

'आठवले गटाला उपमहापौरपद द्यावं'

मुंबई महानगरपालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाव्या आणि उपमहापौर पद द्यावे अशी मागणी सुद्धा आठवले यांनी युतीकडे केली आहे. शिवसेनेवर टीका करत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह द्यावं, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेला मुंबईतून हद्द पार करू असा इशाराही आठवले यांनी दिलाय.

'मविआमुळे वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला'

वेदांत सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे.महाविकास सरकारने याबाबत केंद्राला माहिती देणे गरजेचं होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळेच वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचा आरोप आठवले यांनी केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT