Ramdas Athawale, Abhijit Dipke साम टीव्ही
महाराष्ट्र

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांना सत्ताधारी खासदाराची थेट ऑफर, म्हणाले...

Ramdas Athawale Political Offer to Abhijit Dipke: रामदास आठवले यांनी अभिजीत दीपकेंना रिपब्लिकन पक्षात येण्याची खुली ऑफर दिली असून राष्ट्रीय युवा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शवली. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

Namdeo Kumbhar

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी:

Ramdas Athawale offer to Abhijit Dipke : "अभिजीत दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी कॉकरोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा डॉ. बाबासाहेबांची चळवळ मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. जिथे अन्याय होतो, तिथे आम्ही नक्कीच ठामपणे उभे राहू. अन्याय झाला तरी अन्याय करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठीच आमचे सरकार आहे. आम्ही सत्तेत आहोत म्हणजे सर्व प्रश्न विसरलो असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे दीपके यांच्यासारख्या नवतरुणांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवून त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या युथ विंगचे 'राष्ट्रीय अध्यक्ष' करण्याची माझी तयारी आहे. वेळ आल्यावर मी त्यांच्याशी याबाबत नक्कीच चर्चा करणार असून त्यांनीही यावर विचार करावा," अशी खुली ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांना दिली आहे.

'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात सलग महिनाभर तीव्र आंदोलन छेडून देशभरातील तरुणांमध्ये जागृती निर्माण करणारे तरुण नेते अभिजीत दीपके यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विशेष कौतुक केले.

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी: आठवले

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे एकत्रीकरण व्हावे आणि सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, अशी आग्रही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली. तसेच, रिपब्लिकन ऐक्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि चार पावले मागे जाण्याची आपली तयारी असल्याचे मोठे विधान त्यांनी केले.

रामदास आठवले म्हणाले की, "रिपब्लिकन पक्षाचे एकत्रीकरण होणे समाजाच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या पक्षात खोब्रागडे गट, गवई गट, आंबेडकर गट आणि आमचा आठवले गट असे वेगवेगळे गट अस्तित्वात आहेत. हे सर्व गट आणि नेते एकत्र आले, तर समाजात एक मोठी राजकीय व सामाजिक ताकद उभी राहील; ज्याचा उपयोग समाजाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी होईल."

ऐक्याच्या मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, "रिपब्लिकन ऐक्याबाबत माझी भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या एकत्रीकरणाचे नेतृत्व करावे आणि पक्षाचे अध्यक्ष व्हावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास माझी कोणतीही हरकत नाही, ऐक्यासाठी चार पावले मागे हटण्याची माझी तयारी आहे. जरी सध्या सर्व गट एकत्र आलेले नसले, तरी भविष्यात सर्व रिपब्लिकन नेते एकाच मंचावर येतील आणि एक मोठी ताकद निर्माण करतील," असा विश्वासही रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला जामीन

CM फडणवीस आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलणार; थेट GR चा काढला

Shocking : १० दिवसांपासून पिकअप एकाच जागेवर, दुर्गंधी आल्यानंतर पाहिलं अन् पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली

Fatty liver: लिव्हरवर चरबी जमा झालीये? आहारात या ७ फळांचा समावेश करा, यकृताला मिळू शकतो फायदा

विनोद तावडेंचं वजन पुन्हा वाढलं, भाजपनं दिली सर्वात मोठ्या राज्याची जबाबदारी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT