Ramdas Athawale on Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale on Sharad Pawar: राजकीय नेत्यांना धमकी येणे ही बाब गंभीर; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

Marathi Political News Today: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Shivani Tichkule

Ramdas Athawale News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर आता रामदास आठवले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार (Sharad Pawar)यांच्या सारख्या नेत्याला धमकीचे फोन येणं ही बाब अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली आहे. दिघा येथे आरपीआय तर्फे आयोजित महामानवांची संयुक्त जयंती उत्सव आणि पँथर्सचा सत्कार समारोहासाठी रामदास आठवले आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र मध्ये काय चाललेय हे काही योग्य नाही. कोणत्याही राजकीय नेत्याला धमकीचे फोन येणे योग्य नाही. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चौकशी करत असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.

दरम्यान, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT