ramdas athawale criticises bjp on lok sabha seats distribution Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale: नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका; रामदास आठवलेंचा भाजपवर राेख

Siddharth Latkar

Maharashtra Election 2024 :

महायुती सोबत नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका, आरपीआयचा योग्य सन्मान राखा अशी भावना आज (साेमवार) आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale Latest Marathi News) यांनी सांगली (sangli) येथे माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली. आठवलेंचे हे विधान भाजप नेत्यांना टाेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

आठवले म्हणाले लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. आरपीआय महायुती सोबतच आहे. नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका असा टोलाही आठवलेंनी भाजपला लगावला आहे.

आरपीआयचा महायुती सरकारने योग्य सन्मान राखावा अशी मागणी देखील आठवले यांनी केली. दरम्यान वंचितचे प्रकाश आंबेडकर हे मोदींच्या विरोधात असल्याचे सातत्याने सांगत असले तरी ते जरी मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींच्या सोबत आहे असेही आठवलेंनी स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर हे महाआघाडी सोबत जातील असे वाटत नाही असेही नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT