ramdas athavale & nana patole
ramdas athavale & nana patole saam tv
महाराष्ट्र

पाठीतला खंजीर काढा अन् हिम्मत असेल तर सरकार पाडा; आठवलेंचे पटाेलेंना आव्हान

साम न्यूज नेटवर्क

नांदेड : हिम्मत असेल तर काॅंग्रेसने (congress) मविआचा (mva) पाठींबा काढून घ्यावा असे आव्हान आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athavale) यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेंना (nana patole) दिले आहे. जर तुमच्या पाठीत एनसीपीने खंजीर खूपसला आहे. अजूनही खंजीर तुमच्या पाठीत असेल तर तुम्ही रक्तबंबाळ बसण्यापेक्षा सरकारला दणका द्या असे आठवलेंनी पटाेलेंना आवाहन केले. दरम्यान उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) बॅक टू पॅव्हेलियन (भाजप समवेत) यावे असे आवाहन केले. हे आवाहन करतानाच आठवलेंनी यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हरवायचे हेच आमचे टार्गेट आहे असे नमूद केले. रामदास आठवले आज नांदेड (nanded) जिल्हा दाै-यावर आले आहेत. माध्यमांशी बाेलताना त्यांना विविध विषयांवर चर्चा देखील केली. (ramdas athavale latest marathi news)

आठवले म्हणाले पटाेले धाडसी आहेत. त्यांनी सरकार विराेधात भुमिका घेतल्यास हे मविआचे सरकार पडेल. त्यानंतर आम्ही सरकार बनवू असे आठवलेंनी नमूद केले. ते म्हणाले आमच्याकडे ११७ आमदार आहेत. आम्ही देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविले जाईल. गत पाच वर्षात फडणवीस यांनी सर्वांना बराेबर घेवून कामकाज केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा माणूस चांगला आहे मात्र काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रात अडकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅव्हिलियन (भाजप समवेत) यावे असे मत आठवलेंनी व्यक्त केले.

दरम्यान मुंबईत महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हरवायचे हेच आमचे माेठे टार्गेट आहे. आरपीआय मुंबई पालिकेत सेनेला चांगली टक्कर देईल असेही आठवलेंनी नमूद केले. ते म्हणाले आम्ही भाजप साेबत आहाेत. आम्हांला मुंबईत माेठे यश मिळेल अशी अपेक्षा आहे असेही आठवलेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रिडाविश्वात शोककळा

India Heat Wave Update: सूर्य आग ओकतोय! देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसवर

Who Is KL Sharma: काँग्रेसचे निष्ठावान, सोनिया गांधींचे विश्वासू.. अमेठीतून स्मृती इराणींना टक्कर देणारे के. एल शर्मा कोण?

Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

SCROLL FOR NEXT