सामच्या बातमीची दखल; राज ठाकरेंनी अंध मुलांना व्यासपीठावर बोलावून जिंकली मने!

सबंध महाराष्ट्रतून मनसैनिक पुण्यात आले आहेत.
Raj Thackeray Pune Rally
Raj Thackeray Pune Rally Saam TV
Published On

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात (Raj Thackeray Pune Rally) सभा होत आहे. गुढीपाडव्याची सभा त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादमधिल सभा झाल्यांनतर आज राज ठाकरे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत. राज ठाकरे कोणत्या विषयावरती बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी आजची सभा महत्त्वाची असणार आहे. सबंध महाराष्ट्रतून मनसैनिक पुण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करण्याअगोदर सभेला आलेल्या अंध विद्यार्थांना मंचावर बोलवून त्यांना पहिल्या रांगेत बसण्याची परवानगी दिली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द का केला याचे उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले की अयोध्या ट्रॅप आहे हे माझ्या लक्षात आलं. कारसेवकांना ठार मारले गेलं होतं. कार सेवकांच्या त्या ठिकाणाचं दर्शन घ्यायचं होतं. मी अट्टाहास करुन गेलो असतो तर तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हांला जेल मध्ये सडवलं गेलं असतं.

Raj Thackeray Pune Rally
'ऐसी दादागिरी नही चलेगी'; किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

दरम्यान मागच्या काही काळात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसे कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती. त्याचबरोबर राज ठाकरेंनी नियोजीत अयोध्या दौराही रद्द केला आहे. मशिदीवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरातील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. वसंत मोरे यांनीही भोंग्यांबाबतीत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांना शहर अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावा लागले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com