Ram Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Ram Shinde News: महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर...;लोकसभेच्या जागेवरून राम शिंदेचा सुजय विखे पाटीलांना टोला

Ram Shinde VS Sujay Vikhe Patil: यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढाविण्याची इच्छा जाहीर करत वेटिंग फॉर तिकीट म्हंटल्याने महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात, अहमदनगर

Political News:

भारतीय जनता पार्टीमध्ये आता लॉबी चलत नाही सर्वे होतो, त्यामुळे मी इच्छा जाहीर केली आहे. आता वेटिंग फॉर तिकीट, अशा शब्दांत राम शिंदेनी सुजय विखेना टोला लगावलाय. तसेच अहमदनगर मतदारसंघात लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे जाहीर केले आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना केल्यात. त्यासाठी शहरातील विशाल गणपती मंदिरात विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी स्वच्छता केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढाविण्याची इच्छा जाहीर करत वेटिंग फॉर तिकीट म्हंटल्याने महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना टोला लगावात राम शिंदे यांनी सांगितलं की, आता भारतीय जनता पार्टीत लॉबी करावी लागत नाही शिफारसची आवश्यकता नाही, त्यामुळे मी लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंत हा संदेश गेल्याने आता वेटिंग फॉर तिकीट म्हणत त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार सुजय विखेंसह लोकसभेसाठी महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी तसेच भाजपमधीलच आमदार राम शिंदे यांनी देखील इच्छा व्यक्त केलीये. या निमित्ताने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असून लोकसभेचे तिकीट कुणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्त्वचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT