Rohit Pawar-Ram Shinde Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: राम शिंदेंचा रोहित पवारांना जोरदार धक्का, एका चिठ्ठीने जामखेड बाजार समितीवर भाजपचा झेंडा

Ahmednagar News: रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामुळे जामखेर बाजार समितीच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष होते.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोेरात

Jamkhed APMC Election: राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांचा राजकीय वैर लपून राहिलेलं नाही. ग्रामपंचायत असो की विधानसभा दोन्ही नेते आपल्या मतदारसंघातील मोठ्या ताकदीने एकमेंकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही नेते एकेमेकांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही तसंच झालं. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामुळे जामखेर बाजार समितीच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष होते. मात्र या निवडणुकीत भाजपचे रोहित पवार यांना धक्का देत बाजी मारली आहे.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार गटाचे समसमान 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली आहे.

विशेष म्हणजे जामखेड बाजार समितीत भाजपाचे आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र जामखेडकरांनी बाजार समितीच्या 18 जागांमधून दोघांना समसमान म्हणजेच 9 - 9 जागा निवडून दिल्या होत्या.

त्यामुळे समितीचा सभापती कोणचा होणार याबाबत उत्सुकता लागली होती. त्यानंतर आज जामखेड समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक ईश्वर चिठ्ठी टाकून करण्यात आली, ज्यात भाजपाने बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

Maharashtra News Live Update: लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचा जन्मसोहळा; गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

SCROLL FOR NEXT