PM Modi Saam TV
महाराष्ट्र

PM Modi: मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत PM मोदींचे कठीण व्रत; पहाटे ३.४० वाजता करतात जप

Ram Mandir Pran Pratishtha: देशात सध्या थंडीची लाट पसरली आहे. कडाक्याची थंडी असूनही भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी कसलीही तमा न बाळगता अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Ayodhya:

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होण्यासाठी आता केवळ २ दिवस बाकी आहेत. प्राणप्रतिष्ठा होण्याआधी येथे व्रत करण्यास सुरूवात झाली आहे. मोदींनी यासाठी तब्बल ११ दिवासांचे व्रत केले आहे. यामध्ये ते जमिनीवर सतरंजी टाकून झोपतात अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अशात आता मोदी चक्क पहाटे ३.४० वाजता जप करण्यास सुरुवात करतात अशी माहिती समोर आलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर १ तास ११ मिनिटे अध्यात्मिक कुशल साधूंकडून प्राप्त झालेल्या मंत्रांचा जप करतात. सलग ११ दिवस पहाटे ३.४० वाजता हा जप करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. ११ दिवस करण्यात येणाऱ्या व्रतातील हा सर्वात मोठा आणि विशेष पाठ असणार आहे.

हिंदू शास्त्रांमध्ये एखाद्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करताना सर्व विधी पार पाडावे लागतात. हे विधी फार मोठे असतात. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्याआधीच नियमांचे पालन करण्यास सुरुवात करावी लागते. हे नियम फार कठीण असतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी देखील आध्यात्मिक भावनेनं व्रत करत आहेत.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी काही भाविक हे पायी, काही सायकलवर तर काही चक्क स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. देशात सध्या थंडीची लाट पसरली आहे. कडाक्याची थंडी असूनही भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी कसलीही तमा न बाळगता अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Bigg Boss 19: फिनाले वीकमध्ये गौरव खन्नाला ढसाढसा रडला; 'त्या' प्रश्नामुळे स्पर्धकाच्या डोळ्यात आलं पाणी

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या, शेकडो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Signs Of Heart Failure: मानेची ही एक टेस्ट सांगेल हार्ट अटॅक येणारे; अवघ्या २० मिनिटात कळेल धोका किती?

SCROLL FOR NEXT