Raksha Bandhan Celebration With Trees
Raksha Bandhan Celebration With Trees विजय पाटील
महाराष्ट्र

Raksha Bandhan 2022: वृक्षवल्ली आम्हा सोयरे... चिमुकल्यांनी झाडांना राखी बांधून साजरी केली रक्षाबंधन

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना झाडांना राखी (Rakhi) बांधून सांगलीच्या इस्लामपूरमधील (Islampur) मुक्तांगण शाळेच्या चिमुकल्यांनी अनोखी रक्षाबंधन साजरी केली आहे. "झाड आपलं रक्षण करते, आपणाला खाऊ देते, सावली देते आाता आपणही झाडांचे रक्षण करू" या भावनेने नात्याची जाणीव ठेवत चिमुकल्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरी केली आहे. (Raksha Bandhan With Trees)

हे देखील पाहा -

भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून झाडांना राखी बांधून सणांचे महत्व पटवून देण्यात आले. या सर्व राख्या टाकाऊ वस्तूंपासून मुलांनी पालकांच्या मदतीने तयार केल्या आहेत. यातील काही राख्या झाडांना बांधण्यात आल्या. झाड आपणाला आक्सिजन, सावली, फळे, फुले देते पण तोच खरा माणसाचा आधार आहे. याची जाणीव ठेऊन आम्ही झाडालाच भाऊ समजून राखी बांधली असं या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अंतरवाली सराटीत राजकीय खलबतं? जय पवारांनी अचानक घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण

Akola News : बड्या डॉक्टरांविरुद्ध होती तक्रार; पोलिसांनी महिलेला रात्री २ वाजेपर्यत ठाण्यातचं ठेवले बसवून, कारवाईच्या दिल्या धमक्या

Today's Marathi News Live : मोठी बातमी! रावसाहेब दानवे आज पुन्हा अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी

Sunil Gavaskar On Virat Kohli: 'आम्हीही थोडं फार क्रिकेट खेळलोय..' विराटच्या त्या वक्तव्यावर सुनील गावस्कर भडकले

Madness Machayenge : 'बाहुबली ३ मध्ये रोल मिळाला का?'; कालकेयच्या लूकमध्ये अभिनेत्याला पाहून नेटकऱ्याची भन्नाट प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT