rakhi 
महाराष्ट्र

गाईच्या शेणापासून बनविल्या राख्या; महिलांना मिळाला राेजगार

अभिजीत घोरमारे

गोंदिया : येथील चुटिया गावात ऋषी टेंभरे आणि त्यांची पत्नी प्रिती टेंभरे यांनी पाच वर्षापुर्वी गीर प्रजातीच्या गायीची गाेशाळा सुरु केली आहे. गायीच्या दुधापुरते मर्यादित न राहता त्यांनी गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत, अगरबत्ती तर गाेमुत्रापासून फिनेल ,औषधे तयार करण्यास प्रारंभ केला. त्यास छाेट्या छाेट्या बाजारपेठ देखील मिळू लागल्या आहेत. आता गायीच्या शेणापासून बनविलेल्या राख्यांना ही मागणी वाढू लागली आहे. हि किमया साधली आहे टेंभरे दाम्पत्याने.

दरम्यान कोरोनाचा संकट काळ सुरु झाला आणि देशात लाॅकडाउन झाले. यामुळे अनेक व्यावसायांवर कु-हाड काेसळली. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या भाषणाचा टेंभरे दाम्पत्यावर खाेलवर परिणाम झाला. प्रिती टेंभरे यांनी कोरोना विषाणूमुळे चिनी वस्तूवर होणारा बहिष्कार पाहता तसेच येणाऱ्या रक्षा बंधनाचा उत्सव पाहता गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी rakhi बनविण्याची संकल्पना सुचली. सुरवातीला त्यांनी याचा अभ्यास करत आज त्यास उद्योगाला सुरवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणा पासून सहा हजार राख्या बनविल्या. या राख्या त्यांनी महाराष्ट्रसह गुजरात येथे विक्रीसाठी पाठविल्या.

कोरोनाच्या काळात गावातील अनेक महिलांना रोजगारा पासून वंचित रहावे लागले. या सर्व महिलांना टेंभरे यांनी एकत्रित करुन त्यांना राखी बनविन्याचे प्रशिक्षण दिले. बघता बघता गावातील महिलांना ह्या प्रशिक्षणाचा मोठा फायदा झाला. गाईच्या शेणापासून राख्या निर्मितीला गावात सुरुवात झाली. आता शेणा पासुन इकोफ्रेंडली राखी म्हटल्यावर त्याची किंमत दहा रुपयांपासून ४० रुपयापर्यंत. त्यामुळे इतक्या स्वस्त राख्या गोंदियाकऱ्यांना भावल्या. या राख्यांना बाजारपेठ मिळू लागली. काही भागात याची मोठी मागणी देखील वाढली आहे.

गावातील महिलांबराेबरच या लघु उद्योगात प्रिती यांचे पती ऋषी व जावू श्वेता यांची त्यांना माेलाची साथ लाभली आहे. ऋषी हे मार्केटींगचे काम पाहतात आणि श्वेता या आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्री करिता जाताना कुठलीही कमतरता राहू नये यासाठी राख्यांना व्यवस्थित रंग झाले कि नाही, व्यवस्थित पॅक झाल्या की नाही याकडे विशेष लक्ष देतात.

गाईच्या दूधा बराेबरच शेणापासून राख्या बनविणे आणि ते विक्री करणे केवळ हा उद्देश नसून गाे-हत्या थांबविणे ही देखील आमची भावना आहे. त्यासाठी राखीच्या पाठीमागील बाजूस गाय वाचविण्याचा सामाजिक संदेश लिहिण्यात आहे. आगामी काळात गाईंच्या शेणापासून दिवाळीतील दिवे जे १०० टक्के इको फ्रेंडली असतील ते करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रिती टेंभरे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Uddhav Thackeray : मध्यरात्री शिंदेंचं ऑपरेशन टायगर अन् ठाकरेंना जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश

लातूर हादरले! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; अमानुष कृत्यामागील कारण वाचून चीड येईल

Belapur Tourism : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT