राज्यसभेच्या खासदार समितीने केली अलिबाग समुद्रकिनाऱ्याची पाहणी... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

राज्यसभेच्या खासदार समितीने केली अलिबाग समुद्रकिनाऱ्याची पाहणी...

राज्यसभेच्या खासदार समितीने अलिबाग समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली आहे. जल प्रदूषणाच्या कायद्याचे पालन होत आहे का याबाबत ही पाहणी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: अलिबाग समुद्रकिनारी पाणी प्रदूषणाबाबत असणाऱ्या कायद्याचे पालन प्रशासनाकडून केले जात आहे की नाही याबाबत आज राज्यसभेच्या बारा खासदारांची समिती रायगडात दाखल झाली. अलिबाग समुद्रकिनाऱ्याची पाहणी करून कुलाबा किल्याला समितीने भेट दिली. राज्यसभेच्या बारा खासदारांच्या समितीचा पाच दिवसांचा हा दौरा असून मुंबईत दोन दिवस पाहणी केल्यानंतर आज अलिबागला भेट दिली. त्यानंतर ही समिती गोवा राज्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. (RajyaSabha MP;s committee inspects Alibaug beach)

हे देखील पहा -

राज्यसभेत विविध कायदे बनविले जातात. पाणी प्रदूषणबाबतही कायदा राज्यसभेत पारित केला आहे. मात्र पाणी प्रदूषण कायदे हे पाळले जात नसल्याने त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. पाणी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी राज्यातील प्रशासन हे योग्य पद्धतीने अमलबाजवणी करीत आहेत का यासाठी खासदारांची कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या कमिटीमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाणी प्रदूषणाबाबत माहिती गोळा केली जाते. अलिबाग येथेही राज्यसभेच्या बारा खासदारांची समिती आज दाखल झाली.

अलिबाग समुद्रकिनारी पाहणी केल्यानंतर ही कमिटी कुलाबा किल्ला पाहण्यास गेली. कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का, समुद्राचे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपययोजना करणे आवश्यक आहे. अधिकारी, प्रशासन यांना काय अडचणी येत आहेत. याबाबतची माहिती समितीमार्फत घेण्यात आली आहे अशी माहिती खासदार ऍड वंदना चव्हाण यांनी दिली.

यावेळी खासदार प्रतापसिग बजवा, खासदर वंदना चव्हाण, दुष्यांत चव्हाण, विकास महात्मे, राम विचार नेताम, नरसिंह राव, तिरुची सेवा, विशाल सिंह, अरुण शर्मा, रवींद्र कुमार, बी. के. सिन्हा, विवी एस खऱ्यात, प्रदीप तामता, विवेक तनखा या बारा खासदाराची समिती आली होती. यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT