मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ६७ देवदूत कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर...

देवदूत कर्मचारी-कामगारांची पगारवाढ, घरभाडे भत्ता, शिक्षण भत्ता, रेस्क्यू भत्ता, मेडिक्लेम अशा विविध बावीस मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ६७ देवदूत कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ६७ देवदूत कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर...दिलीप कांबळे
Published On

पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर देवदूत म्हणून काम करणारे ६७ कामगार पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कामगारांची पगारवाढ, घरभाडे भत्ता, शिक्षण भत्ता, रेस्क्यू भत्ता, मेडिक्लेम अशा विविध बावीस मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. कुसगाव येथील आयआरबी कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. (67 devdoot employees on Mumbai-Pune Expressway on indefinite strike from today)

हे देखील पहा -

एक्सप्रेस वेवर अपघात झाल्यात तात्काळ सेवा देण्यासाठी आर्यन पंम्प अँड इनव्हिरो सोल्युशन या कंपनीच्या माध्यमातून 2015 सालापासून देवदूत यंत्रणा काम करत आहे. मागील वर्षभरापासून देवदूतच्या कामगारांचा पगार वाढीचा प्रश्न रखडला आहे. मागील वर्षी देवदूत यंत्रणेने संपाचे हत्यार उपसल्यानंतर कंपनीने सामंजस्याने चर्चा करण्याची तयारी दर्शवली मात्र वर्षभरात कंपनीने कोणतीही चर्चा न केल्याने भारतीय मजदूर संघाने संपाची नोटीस बजावत आजपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ६७ देवदूत कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर...
सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा - मुख्यमंत्री

कंपनीने कामगारांच्या मागण्यांचा तात्काळ विचार न केल्यास व या आंदोलनाच्या दरम्यान एक्सप्रेस वेवर काही अपघात झाल्यास त्याची मोठी किंमत अपघातग्रस्तांना चुकवावी लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com