Mahavikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

'लगान'मधील लाखा कोण? मविआ सरकारनं शोधावं; राज्यसभेतील पराभवानंतर कॉंग्रेस नेत्याचा सल्ला

कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक ट्विट करत महाविकास आघाडीला सल्ला दिल्ला आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचं (Rajya Sabha Election 2022) मतदान शुक्रवारी पार पडलं. मध्यरात्री निकालही लागला. मात्र, सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे शिवसेनेच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या पराभवाची. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना देखील भाजपने अनेक मतं फोडून धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणले. इतकंच नाही तर, भाजपने (BJP) राज्यसभेतील तिन्ही उमेदवार सहज निवडून आणले. निवडणुकीत अपक्ष आमदारांनी साथ दिली नाही, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक ट्विट करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सल्ला दिल्ला आहे. (Rajya Sabha Election 2022 Mahavikas Latest News)

काय म्हणाले सचिन सावंत?

महाविकास आघाडीतून फुटलेल्या तसेच भाजपला मतदान करणाऱ्या आमदारांना टोला लगावत सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. सावंत यांनी लगान चित्रपटाचं उदाहरण देत हे ट्विट केलं आहे. “राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले ‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’ कोण आहेत हे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषद निवडणुकीअगोदर तात्काळ शोधून काढावे”, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी महाविकास आघाडी सरकारला सल्ला दिला आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. त्यातच मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या काही आमदारांची मतं बाद ठरवावी अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात मध्यरात्री निवडणूक आयोगाने निर्णय देत महाविकास आघाडीचे सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं. मात्र, त्यानंतर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपाचे तीन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले. त्यामुळे सहावी जागा भाजपने जिंकली.

दगाबाजी केलेल्या आमदारांची यादी आमच्याकडे : राऊत

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत झालेल्या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडलं आहे. 'आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. काही जे घोडे जे बाजारातले होते ते विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं मला वाटतं. यामुळे अपक्षांची ६-७ मतं आम्हाला मिळाली नाही. ते (अपक्ष) कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष जे आहेत त्यातलं एकही मत फुटलं नाही. ती सगळी मतं आम्हाला मिळाली आहेत'. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, 'फक्त बाजारात घोडे बाजारात जे लोक उभे होते त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळू शकली नाही. ज्याने कुणी शब्द देऊनही दगाबाजी केली आहे, त्याची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहिती आहे कुणी आम्हाला मत दिलं नाही. पण ठिक आहे पाहूयात' असा सूचक इशारा त्यांनी अपक्ष आमदारांना दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT