>> रणजीत माजगावकर
मुंबई : साखर कारखान्यांचा एफआरपीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने उद्यापासून राज्यात मंत्र्यांना अडवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे.
राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. 25 नोव्हेंबर रोजी चक्का जाम करणार असून राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील जनतेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडी आणि या सरकारला अद्दल घडवणार. या दोन्ही सरकारसोबत आमचं काही देणे घेणे नाही. 100 खोके दिले तरी या पुढे हे सरकार येऊ देणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. (Maharashtra News)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलकांनी शिवारातील ऊस तोड रोखली. साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक आडवली. मात्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही.
सहकार मंत्री कोणतीही दाखल घेत नाहीत. मुख्यमंत्री कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा पूर्ववत का करत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. ऊसतोड मजुरांसाठी मुकादम व्यवस्था सरकारने नष्ट केली पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
स्वाभिमानाच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र तरीही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. हे सरकार असंवेदनशील सरकार आहे. उसाचं वजन करणारे काटे दुरुस्त करून त्यावर नियंत्रण करा. वर्षाला काटे मारीतून साडेचार हजार कोटी रुपयांची लूट केली जाते. तोडणी वाहतुकीचा खर्च भरमसाट दाखवलाय, त्याचे ऑडिट करा. सरकार हे का करत नाही? असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.
ही रक्कम एफआरपी मधून वजा होते व शेतकऱ्यावर बोजा पडतो. याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. कारखाने रिकव्हरी कमी काढवून शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत. कारखानादारना सरकार संरक्षण देत आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला एफआयआर आधी 200 रुपये अधिक द्या ही मागणी आहे, मात्र कारखाने देत नाही, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.