Vikram-S Rocket launch: अभिमानास्पद! इस्रोनं लॉन्च केलं पहिलं प्रायव्हेट कंपनीचं रॉकेट; जाणून घ्या काय आहे खास...

ISRO Rocket Launch News: 'भारतातील खाजगी क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप आहे.
Vikram-S Rocket launch
Vikram-S Rocket launchTwitter/@isro

ISRO Rocket Launch News: आंतराळ क्षेत्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय आंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थात इस्रोने आज, एका खाजगी कंपनीचे रॉकेट लॉन्च करुन इतिहास घडवला आहे. विक्रम-एस Vikram-S असं या खाजगी रॉकेटचं नाव असून हैदराबादच्या स्कायरूट एयरोस्पेस नावाच्या खाजगी कंपनीनं हे रॉकेट बनवलं होतं. (Vikram-S Rocket launch)

Vikram-S Rocket launch
Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत दंगल नियंत्रण पथक तैनात; मनसेच्या इशाऱ्यानंतर पोलिस सतर्क

इसरोने श्रीहरिकोटा येथील केंद्रातून भारतातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम-एस' प्रक्षेपित केले. या प्रक्षेपणानंतर खासगी रॉकेट कंपन्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमेत प्रवेश केला आहे. विक्रम-एस रॉकेट देशाच्या अंतराळ उद्योगात खाजगी क्षेत्राच्या प्रवेशाचे प्रतीक आहे, ज्यावर अनेक दशकांपासून सरकारी मालकीच्या इस्रोचे वर्चस्व होते.

केंद्र सरकारने 2020 मध्ये अवकाश उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंतर 'स्कायरूट एरोस्पेस' ही भारतीय अंतराळ कार्यक्रमात पाऊल टाकणारी भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील कंपनी ठरली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास 'विक्रम-एस' रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्याची योजना होती. सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केल्यानंतर आता 'विक्रम-एस' 81 किमी उंचीवर पोहोचेल. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचे नाव ठेवण्यात आले आहे.

इस्रोने श्रीहरिकोटा येथील केंद्रातून भारतातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम-एस' प्रक्षेपित केले. या प्रक्षेपणानंतर खासगी रॉकेट कंपन्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमेत प्रवेश केला आहे. विक्रम-एस रॉकेट देशाच्या अंतराळ उद्योगात खाजगी क्षेत्राच्या प्रवेशाचे प्रतीक आहे, ज्यावर अनेक दशकांपासून सरकारी मालकीच्या इस्रोचे वर्चस्व होते.

Vikram-S Rocket launch
हेच का तुमचं हिंदुत्व? सुषमा अंधारेंविरोधात मराठा युवा सेनेकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी; उद्धव ठाकरेंवरही निशाणा

केंद्र सरकारने 2020 मध्ये अवकाश उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंतर 'स्कायरूट एरोस्पेस' ही भारतीय अंतराळ कार्यक्रमात पाऊल टाकणारी भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील कंपनी ठरली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास 'विक्रम-एस' रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्याची योजना होती. सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केल्यानंतर आता 'विक्रम-एस' 81 किमी उंचीवर पोहोचेल. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचे नाव ठेवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com