Maharashtra Farmer Protest Over Milk Price: Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: '४० रुपये दर द्या, अन्यथा मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखू', राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

Maharashtra Farmer Protest Over Milk Price: नगर - मनमाड महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २ जुलै २०२४

'दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा' या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात रास्ता रोको केला. राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होते. यावेळी नगर - मनमाड महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला.

काय म्हणाले राजू शेट्टी?

"दुधाला किमान 40 रुपये दर देण्याचा निर्णय घ्या. याबाबतचा निर्णय न झाल्यास सोमवारनंतर शांत बसणार नाही. सरकारचं नाक दाबल्याशिवय तोंड उघडत नाही. या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

तसेच "सरकार अनेक निर्णय घेते आणि घोषणा करते. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती. दुधाचे भाव 12 रुपयांनी खाली आलेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे. आज 2 जुलै असताना अद्याप दूध अनुदानाचा निर्णय घेण्यात आला नाही," असेही राजू शेट्टी म्हणाले.

दुग्धविकास मंत्र्यांनी कधी बैठक घेतली मला माहीत नाही. मला निमंत्रण नव्हते. एकेकाळी महाराष्ट्राकडे पाहून देशाचे दुधाचे धोरण ठरत होते. आता दुधाची शिखर संस्था दुसऱ्यांना देण्याची वेळ सरकारवर आली. लोकसभेला फटका बसलाय, विधानसभेला बसण्याची वाट पाहू नका असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT