shaktipeeth mahamarg Saam tv
महाराष्ट्र

रक्ताचा शेवटचा थेंब...; शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला, बड्या नेत्याचा सरकारला मोठा इशारा

raju shetti on shaktipeeth mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला दिवसेंदिवस विरोध वाढला आहे. महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारला मोठा इशारा दिला आहेत

Vishal Gangurde

शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला

सांगलीत शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध

राजू शेट्टी यांचा शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला मोठा इशारा

रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत शक्तिपीठ महामार्गाला ताकदीने विरोध करणार असल्याचा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या विटा येथे पार पडलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

नव्या रेखांकनामुळे कडेगाव, विटा, वाळवा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र याला शेतकऱ्यांचा विरोध वाढू लागला आहे. विटा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राजू शेट्टी म्हणाले, 'ज्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे. त्यालाच आपला विरोध आहे. राज्यातल्या कोणत्याही महामार्गाला आजपर्यंत शेतकऱ्यांनी आणि आम्ही विरोध केला नाही, असं देखील राजू शेट्टींनी यावेळी स्पष्ट केलं. राजू शेट्टी यांच्या भूमिकेनंतर सरकार काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

हिंगोलीतही शक्तिपीठ महामार्गाला विरोध

हिंगोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीने शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं आहे. हिंगोली-नांदेड राज्य मार्गावरील शिरड शहापूर येथे एक तास हे आंदोलन करण्यात आलं आहे.

दरम्यान, सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द असे म्हणत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

शिंदे घराण्याची 500 वर्ष जुनी 3000 किलोची तोफ चोरीला; दरोडेखोर घेऊन आले होते ट्रक अन् क्रेन

SCROLL FOR NEXT