Raju Shetti News Saam TV
महाराष्ट्र

Raju Shetti News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरूवात; साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक

Kolhapur Raju Shetti: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५२२ किलोमीटरची ही पदयात्रा सुरू होत आहे.

Ruchika Jadhav

रणजीत माजगावकर

Kolhapur:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्चाला आजपासून सुरूवात झालीये. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५२२ किलोमीटरची ही पदयात्रा सुरू होत आहे. ही पदयात्रा २२ दिवसांची असून ३७ कारखान्यांनी गाळप केलेल्या तीन कोटी टन उसाचे प्रति टन ४०० रुपये प्रमाणे बाराशे कोटी वसूल करण्यासाठी आक्रोश पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या दारातून या आक्रोश यात्रेस सुरुवात होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यापासून या पद यात्रेला सुरुवात झालीये. सरकार, राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही पदयात्रा काढत आहोत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीये.

सगळी सूत्र अजित पवारांच्या हाती द्यावीत...

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शिरोळमधूनही यात्रा काढण्यात आलीये. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टींनी सरकारवर सडकून टीकास्त्र सोडलंय. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. शेतकरी आणि त्यांचे प्रश्न याची त्यांना जाण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्र त्यांच्या हाती द्यावीत, असं राजू शेट्टी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT