raju shetti demands help to grape grovers  saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti: द्राक्ष पीक विमा योजनेचा निकष बदला : राजू शेट्टींचे सरकारला आवाहन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे द्राक्ष बागायतारांनी संघटित होण्याची गरज असल्याचे राजू शेट्टींनी नमूद केले.

विजय पाटील

Sangli News :

द्राक्ष बागायतदारांचे संपूर्ण कर्ज माफ करा, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी सांगली येथे केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे द्राक्ष बागायतारांनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत राजू शेट्टींनी यांनी राज्य सरकारने मदतीचा हात न दिल्यास रस्त्यावर उतरून न्याय देवू असा विश्वास द्राक्ष उत्पादकांना दिला. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाचा हंगाम वाया जाण्यासारखी परिस्थिती झाली आहे. पावसाने आता बागेतील द्राक्ष घड अक्षरशः झाडावरच कुजून जाऊ लागलेत.

सांगली जिल्ह्यातील मिरज तासगाव कवठेमहांकाळ आदी भागातील द्राक्ष बागाची पाहणी माजी खासदार राजू शेट्टी, सांगलीचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदाराचे संपूर्ण कर्ज माफ करा, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेट्टी म्हणाले राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला हवीत. त्याचबरोबर द्राक्ष पीक विमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे. त्यामुळे ती बदलयला हवी. ऊस उत्पादक शेतकऱ्या प्रमाणे द्राक्ष बागायतारांनी संघटित होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केलेय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

SCROLL FOR NEXT