Raju Shetti News Saam TV
महाराष्ट्र

Raju Shetti: राज्य सरकार साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर; राजू शेट्टी यांचा घणाघात

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर

Raju Shetti News:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज २२ व्या ऊस परिषद पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ही ऊस परिषद संपन्न झाली. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला चारशे रुपये दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली. 22 व्या ऊस परिषदेदरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

या परिषदेत राजू शेट्टी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. राजू शेट्टी म्हणाले, 'सगळ्या साखर कारखानदारांच्या नातेवाईकांच्या साखर ट्रेडिंगच्या कंपन्या आहेत. काहींच्या कंपन्या दुबईत देखील आहेत. फसवाफसवी करत असल्यामुळे चारशे रुपये मिळाल्याशिवाय तुम्हाला ऊसाचं एक कांडे सुद्धा आम्ही देणार नाही. काटा मारलेली आणि रिकव्हरीत चोरलेली साखर कारखानदारांकडे सापडत आहे. ट्रक भरून साखर आहे, पण त्याची बिले नाहीत'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'या काळ्या उद्योगावर जीएसटी विभाग का कारवाई करत नाही, पोलीस शेतकऱ्यांना त्रास देतात, मग साखरेची चोरी करणाऱ्यांची तपासणी का करत नाहीत? साखर कारखान्यांकडे अॅडजेस्ट केलेली बिले सापडत आहेत. चढ्या दराने साखर विकली तर महसूल दिसतो. महसूल दिसला तर शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात म्हणून हे कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

'सगळे साखर कारखानदार एका माळेचे मणी आहेत.कारखान्यांवर चार ते पाच शेतकरी संघटनेची माणसं नेमण्याची परवानगी द्या, त्यांचे पगार आम्ही देतो. आपोआपच कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे देतील. राज्यातील कारखान्यांना उत्कृष्ट कारखान्याचे पुरस्कर मिळतात, मात्र दुसऱ्या बाजूला त्याची रिकव्हरी खाली येत आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावे 500 पेक्षा जास्त टनाचा ऊस आलाय, त्यांची नावे जाहीर करावीत. हे सरकार साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर झालेलं आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

शेतकरी संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्ष उफळला

'ऐन दिवाळीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष उफळला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ऊस परिषद संपल्यानंतर आंदोलन सुरु केलं. ऐन दिवाळीत राजू शेट्टी ठिय्या आंदोलनाला बसले. दिवाळी झाल्यानंतर पंधरा तारखेनंतर पुढील दिशा ठरवणार आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT