Raju Shetti  Raju Shetti
महाराष्ट्र

Raju Shetti : राज्य सरकार नेबळटपणा दाखवतंय; कर्नाटकातील लोकांच्या पाणी चोरीवरून राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti on water theft : राजापूर बंधाऱ्यातील पाणी चोरीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार नेबळटपणा दाखवतंय, अशा शब्दात राजू शेट्टींनी टीका केली आहे.

Vishal Gangurde

कोल्हापूर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्र हद्दीतील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातील कर्नाटकातील लोकांकडून पाणी चोरीची घटना घडत आहेत. कर्नाटकातील अज्ञात लोकांनी बंधाऱ्यावरील लाकडी बर्गे काढल्याचाही प्रकार समोर आलाय. यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पाणी चोरीवरून राज्य सरकार नेबळटपणा दाखवतंय, अशा शब्दात राजू शेट्टींनी टीका केली आहे.

राजापूर बंधाऱ्यातील पाणी चोरीवरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, 'महाराष्ट्राचे पाणी वेगळं आणि कर्नाटकचे पाणी वेगळं आहे. कर्नाटाकातील लोकांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना आपलं पाणी अशा पद्धतीने घेत असतील, तर मग सरकार काय करतंय? सरकार वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे.

'पाणी चोरीबाबत कर्नाटक सरकारला जाब विचारला पाहिजे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. या प्रकरणाबाबत सरकार नेबळटपणा दाखवत आहेत. त्यामुळे कारण नसताना शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं, हे कानात घालून ऐका, असे ते पुढे म्हणाले.

शक्तिपीठ महामार्गावर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, 'कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ जूनला शक्तिपीठ महामार्ग विरोधात प्रचंड मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. कोणत्याही महामार्ग हा जनेतसाठी, भाविकांसाठी नाही. तर राजकीय नेत्यांना समृद्धीसारखा अधिक समृद्ध करण्यासाठी हा महामार्ग आहे. देवस्थानासाठी हा महामार्ग नियोजित केलेला आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी,पंढरपूर, तुळजापूर, परळी, वैजनाथ या कुठल्याही देवस्थानला जात असताना ट्रॅफिक जाम झालाय, आपत्कालीन परिस्थिती आहे, असं काहीही झालेलं नाही'.

'आता सांगली ते धाराशिव हा महामार्ग आहे. त्याच्यावर दोन ते तीन टोल नाके आहेत. त्यामध्ये अपेक्षित टोल वसूल होत नाही. तसेच अपेक्षित वाहतूक नाही. मग महामार्ग नवीन काढायची काय गरज? टेंडर काढून पैसे खाता यावे यासाठी हा महामार्ग आहे का? समृद्धी महामार्गाने आमदारांची किंमत 50 कोटी केली, शक्तिपीठांना किती शक्ती मिळणार आहे. कोणाची किंमत किती होणार आहे. आम्ही हे होऊ देणार नाही, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT