Rajesh Tope/ Gopichand Padalkar SaamTV
महाराष्ट्र

"आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ; राजेश टोपे भविष्यात जेलमध्ये जाऊ शकतात"

रात्री 10 वाजता आरोग्यमंत्री सांगतात उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी एवढा घोळ घालून ठेवला आहे कि भविष्यात ते आर्थर जेलमध्ये जाऊ शकतात असं खळबळजनक वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपुर्वी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा (Health Department Exams) परिक्षेच्या आधीच्या दिवसापर्यंत राजेश टोपे यांनी परीक्षा वेळेवरती होणार असं सांगितलं होतं तसेच परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये काही बदल होणार नाही. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील ते म्हणाले मात्र उद्या परीक्षा होणार असताना विद्यार्थी आपआपल्या परीक्षाकेंद्रावरती (Exam Center) निघाले असताना रात्री 10 वाजता हे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात की उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट असून तुम्हा किती लोकांच्या भावनेशी खेळताय असं देखईल पडळकर म्हणाले. (Rajesh Tope will go to jail in future)

हे देखील पहा -

अनिल देशमुखांना पाहून काम करा -

तसेच मोठ्या साहेबांच्या हाताखाली काम करायचं म्हणजे अशी कामे करावी लागतात असा टोला देखील त्यांनी शरद पवारांना लगावला. अनिल देशमुखांची अवस्था पाहून तरी इतर मंत्र्यांनी काम करावं असा सल्ला ही पडळकर यांनी दिला आहे. देगलूर विधानसभा निवडणुकींच्या प्रचारार्थ मानूर येथील सभेत पडळकर बोलत असताना त्यांनी वरील विधान केली आहेत.

परीक्षांमध्ये गोंधळ सुरूच -

तसेच पुढे ढकलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा आज होत आहेत मात्र आजदेखील या परीक्षांमध्ये गोंधळ सुरूच आहे. मुंबई, पुणे, नाशिक (Mumbai, Pune, Nashik) येथे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं समोर येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर, मुलांच्या आसनव्यवस्थेमध्ये घोळ. तर नाशिकमध्ये निम्म्या विद्यार्थांना पेपरच मिळाले नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीच वातावरण निर्माण झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT