लक्ष्मण सोळुंके
जालना : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणत थैमान घातले असताना, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. मात्र राज्यातील इतर भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणत घट झाली असून त्या ठिकाणची परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता त्रस्त आहे. Rajesh Tope to meet Union Health Minister regarding increased supply of vaccines
हे देखील पहा -
एक तर हे निर्बंध पूर्णपणे शिथिल करावे, किंवा कडक लॉकडाऊन करावा या बाबद आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून या बाबद मुख्यमंत्री निर्णय घेतील असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे,
ज्या जिह्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे किंवा ज्या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. त्या त्या भागात निर्बंध जाहीर करावेत, मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी आणि निर्बंध काढून टाकण्यात यावेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असंही टोपे म्हणाले.
राज्यात लसीकरणाचा तुटवडा, हे सत्य आहे या लसीच्या वाढीव पुरवठ्या बाबद केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले असून अमरावती, नागपूर या ठिकाणी लसींचा पुरवठा पूर्णपणे संपला आहे. त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली लस लॉजिस्टिक, औरंगाबाद येथे पोहचली असून उद्या दुपार पर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात 3 कोटी लसमात्रांची आवश्यकता असून त्या बाबद विधान सभेत ठराव केलेला असून केंद्रानी त्या पद्धतीचा पुरवठा केल्यास, सामूहिक लसीकरण योग्य पार पडणार असल्याचे ही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.