Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News, Satej Patil, Mahadevrao Mahadik saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : ‘राजाराम’साठी आज सत्ताधारी, विराेधी पॅनेलची बालेकिल्ल्यात सभा; रविवारी मतदान

राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election) निमित्ताने गेली महिनाभर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ढवळून निघालेला आहे. या निवडणुकीतील प्रचाराची आज रात्री दहा वाजता सांगता होणार आहे. (Breaking Marathi News)

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्तारूढ गटाची म्हणजेच महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांच्या पॅनलची सभा शिरोली इथं हाेणार आहे. तर विरोधी गट माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांच्या पॅनलची सभा आज कसबा बावडा परिसरात होणार आहे.

सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक या दोन्ही नेत्यांनी आप आपल्या बालेकिल्ल्यात शेवटची सभा आयोजित केलेली आहे. त्यामुळे आज या सभांमध्ये नेमके कोणते आरोप प्रत्यारोप होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेला आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून 122 गावं आणि साडेसहा तालुक्यांमध्ये निवडणुकीचा धुरळा उघडला होता. तो आज रात्री शांत होईल. राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान होणार आहे. तर निकाल 25 एप्रिल रोजी लागणार आहे.

साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या भरगच्च सभा झाल्या. यातून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी उडाल्या. मात्र आज रात्री या निवडणुकीचा धुरळा शांत होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT