Rajan Salvi Shivsena Saam Tv
महाराष्ट्र

Rajan Salvi : राऊतांमुळे माझं मंत्रिपद हुकलं, शिंदे गटात प्रवेश करताच साळवींचा राऊतांवर घणाघाती टीका

Rajan Salvi Shivsena : माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशांनंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये 'विनायक राऊत यांच्यामुळे शिवसेना सोडली, त्यांच्यामुळे माझं मंत्रिपद हुकलं', असे वक्तव्य केले.

Yash Shirke

Rajan Salvi Shinde Shivsena : माजी खासदार राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनामध्ये प्रवेश केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. राजन साळवी यांच्या पक्षांतरामुळे कोकणात ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. दरम्यान साळवी यांनी विनायक राऊत यांच्यामुळे पक्ष सोडला असे विधान केले आहे.

ठाण्यामध्ये राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये विनायक राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'विनायक राऊत यांच्यामुळे माझं मंत्रिपद हुकलं. ज्या राऊतांना आम्ही मोठं केलं त्यांनीच पराभव केला. मला मंत्री करावं अशी शिफारस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. हुकलेलं मंत्रिपद मिळेल असं वाटलं होतं पण माझा पराभव झाला. २०२४ चा पराभव हा माझ्या जिव्हारी लागला. विनायक राऊतांनी आमच्या विरोधात कामं केली'

'आनंद आश्रम ही पवित्र जागा आहे. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे. आज पक्षप्रवेशाच्या वेळी माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. ठाकरेंचा पक्ष सोडत असल्याने डोळ्यात अश्रू आहेत. पण शिंदेंची पुन्हा साथ मिळाल्याने आनंदाश्रू आहेत', असे वक्तव्य राजन साळवी यांनी केली. तर एकनाथ शिंदे यांनी साळवींच्या पक्षाप्रवेशावर कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा गुहेत परतला असे उद्गार काढले.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करत हाती धनुष्यबाण घेतले. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि राजन साळवी यांच्यात सातत्याने वाद सुरु होते. यात उद्धव ठाकरेंनी राऊतांची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे राजन साळवी नाराज होते. या नाराजीच्या कारणामुळेच त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे कबूल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत?

Manoj jarange patil protest live updates: पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त

Manoj Jarange : आंदोलकांवर जरांगेंचं नियंत्रण नाही, त्यांना मुंबईबाहेरच रोखा; कोर्टाच्या सूचना

Parbhani : मराठा आंदोलकांना तातडीने पोहचणार मदत; आंदोलनासाठी परभणीत पहिले मदत कार्यालय

Pune Highway: चाकणची वाहतूक कोंडी सुटणार; पुणे-नाशिक प्रवास होईल काही मिनिटात, जाणून घ्या कुठे आणि कसा होणार महामार्ग?

SCROLL FOR NEXT