Raj-Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Alliance : 'महाराष्ट्राच्या मनात तेच होईल', युतीवर ठाकरेंचं सूचक विधान; उद्धव-राज जपणार ठाकरे ब्रँण्ड

Raj-Uddhav Thackeray Alliance : मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याचं युतीसाठी मनोमिलन झालयं. मात्र पक्षप्रमुखाचं मनोमिलन कधी होणार? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? उद्धव ठाकरेंनी युतीसाठी कोणते संकेत दिलेत?

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : महाराष्ट्राच्या हितापुढे कोणीही मोठं नाही. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चेची कवाडं उघडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक भूमिका घेतल्यानं उभ्या महाराष्ट्राचं ठाकरे बंधुच्या युतीकडे लक्ष लागून राहिलं. राज्याच्या चौका चौकात, चावडी-बावडीपासून सर्वत्र ठाकरेंच्या युतीचीच चर्चा सुरु झाली. मात्र ही केवळ चर्चाच असतांना दोन्ही पक्षाकडून युतीसाठीचा जाहीर पुढाकार काही पाहायला मिळाला नाही. मात्र आज उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य म्हणजे युतीवर शिक्कामोर्तब म्हटलं जातंय.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याआधी ठाकरे बंधूंचे फोन झाले असतील असं म्हणत संजय राऊतांनी चर्चेचं सुतोवाच केलं होतं. मात्र महाराष्ट्राच्या मनापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात युती आहे का असा प्रश्न विचारून संदिप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचा चेंडू पुन्हा ठाकरेंच्या कोर्टात टोलावलाय.

सेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय. आता युतीच्या घोषणेची मुहुर्त हा १४ जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसाला ठरतो की १९ जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT