Raj Thackeray, Parli Court, Beed News
Raj Thackeray, Parli Court, Beed News saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Parli News : राजप्रेमींचा भाजप, एनसीपीच्या बालेकिल्ल्यात धुडगूस; उत्साहाच्या भरात...

डॉ. माधव सावरगावे, विनोद जिरे

Raj Thackeray Parli Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर फिदा असलेली जनता आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथे पाहयला मिळाली. न्यायालयात जाई पर्यंत ते पुन्हा मुंबईला जाईपर्यंत राज ठाकरेंना पाहण्यासाठी बीडकरांची माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली हाेती. परिणामी बुहतांश ठिकाणी राज ठाकरेप्रेमींचा धुडगूस देखील पाहयला मिळाला. (Maharashtra News)

आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद (aurangabad) विमानतळावर आले. तेथे राज ठाकरेंना माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला. परंतु ठाकरे यांनी काेणताही संवाद साधणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काही माेजक्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी हुर्डा खाण्याचा आनंद लुटला. तेथून वाहनाने ते परळीत पाेहचले.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी परळीत (parli) युवा वर्ग रस्त्यावर उतरला हाेता. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जेसबीच्या साह्याने पुष्पवृष्टी केली. तसेच युवकांचा जथ्था मोटारसायकलवरुन परळी न्यायालयात (court) पाेहचला. यावेळी अनेकांनी जाेर जाेरात दुचाकीचे हाॅर्न वाजविणे सुरु ठेवले हाेते.

न्यायालय परिसरात माेठ्या प्रमाणात राज ठाकरेप्रेमींची गर्दी हाेती. अनेकांनी ज्या ठिकाणी सुनावणी हाेणार हाेती तेथील न्यायालयात देखील गर्दी केली हाेती. काहींनी न्यायालय परिसरात घाेषणा दिल्या. या कृतीवरुन न्यायालयाने कार्यकर्त्यांना फटकारले देखील.

वकीलांच्या युक्तीवादानंतर न्यायालयात राज ठाकरेंना दिलासा मिळाला. त्यांच्यावरील अटक वाॅरंट रद्द झाले. परंतु न्यायालयाने त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठाेठावला. या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारीला हाेणार आहे. ठाकरे हे न्यायालयातून बाहेर पडले. त्यांना पाहण्याचा नादात अनेकांकडून न्यायालय परिसरातील रेलींंगची माेडताेड झाली. त्यामुळे उपस्थित वकील वर्ग देखील नाराज झाल्याचे चित्र हाेते.

राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांचे वेगवेगळे स्टंट देखील पाहायला मिळाले. त्यांच्या ताफ्यातील वाहनांतील कार्यकर्ते खिडकीच्या बाहेर उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत हाेते. हा स्टंट परळी ते गोपीनाथ गड पर्यंत पाहण्यास मिळाला. एकंदरीतच एका प्रकरणात संशयित आराेपी म्हणून न्यायालयात आलेले राज ठाकरे यांचा जनतेवरील करिष्मा आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळाला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT