Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; ११ जुलैला हजर राहण्याचे आदेश

विजय पाटील

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सांगलीच्या शिराळ कोर्टानं हे वॉरंट काढलं असल्याची माहिती आहे. 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. यापूर्वी वॉरंट बजावून सुद्धा राज ठाकरे चौकशीला हजर राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयाने अजामीन पत्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांना 11 जुलै रोजी सांगली कोर्टात हजर राहावं लागणार आहे. (Raj Thackeray Latest Marathi News)

दरम्यान, राज ठाकरे यांच्या प्रमाणेच मनसे नेते शिरीष पारकर यांना सुद्धा न्यायालयाने हजर राहण्याचे वॉरंट बजावले होते. त्यानुसार बुधवारी शिरीष पारकर हे न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला आहे. शिरीष यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर आणि 700 रुपए खर्चाची दंडाची रक्कम भरून न्यायालयाने जामीन दिला आहे. शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली.

नेमकं प्रकरण काय?

भारतीय रेल्वेमध्ये महाराष्ट्रीत तरुणांना प्राधान्य मिळावं यासाठी 2008 साली मनसेनकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. या घटनेच्या निषेधार्थ मनसेकडून महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात आलं होतं. तसेच बंदही पुकारण्यात आला होता.

दरम्यान, बंद पुकारण्यात आल्यानंतर शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंत आणि इतर काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. राज ठाकरे यांना 8 जून 2022 रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi: कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

Live Breaking News : तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२.६३ टक्के मतदान

Pakistan Cricket Team: टी-२० वर्ल्डकपआधीच पाकिस्तान संघात फूट? बाबर- इमाद वसीम आपसात भिडले; पाहा Video

Blood Pressure कमी झाल्यावर काय खाणे योग्य ठरते

Jiya Shankar: सौंदर्य तुझं पाहून;'जिया' धडक जाये!!

SCROLL FOR NEXT