MNS Workers Protest Over Mumbai Goa Highway potholes SAAM TV
महाराष्ट्र

MNS Andolan : आधी ऑफिस, टोलनाका आणि आता जेसीबी फोडला; मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचा खळ्ळखट्याक सुरुच

MNS Protest for Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली असून, मनसैनिकांकडून खळ्ळखट्याक सुरूच आहे.

Nandkumar Joshi

अमोल कलये

MNS Protest for Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली असून, मनसैनिकांकडून खळ्ळखट्याक सुरूच आहे. आधी ठेकेदार कंपनीचं कार्यालय आणि टोलनाका फोडल्यानंतर पाली येथे ठेकेदाराचा जेसीबी फोडला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पनवेलमधील मेळाव्यात मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली होती.

त्यानंतर आंदोलनाबाबत भूमिका मांडली होती. त्यानंतर काही तासांतच मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली होती. तसेच टोलनाकाही फोडला होता.

या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच आता मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथे ठेकेदाराचा जेसीबी फोडला.

गेल्या २४ तासांतील ही तिसरी घटना असून, जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत नाही तोपर्यंत खळ्ळखट्याक सुरूच राहील, असा आक्रमक पवित्रा मनसैनिकांनी घेतल्याचे दिसते.

पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असून, अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे.

गेल्या २४ तासांत मनसैनिकांनी तोडफोड केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. संभाव्य घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

रत्नागिरी शहर पोलिसांचे एक पथक कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे.

दुसरीकडे पाली येथील तोडफोड प्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT