Raj Thackeray arrives at CM Devendra Fadnavis’ residence after BEST election loss, fueling political buzz in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Thackeray brand setback in BEST polls: बेस्ट पतपेढीत पराभूत झाल्यानंतर राज ठाकरेंनी टायमिंग साधत फडणवीसांची भेट घेतलीय... मात्र या भेटीचं कारण काय? या भेटीतून राज ठाकरेंनी काय साधलंय?

Omkar Sonawane

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि महायुतीच्या पॅनलने मुसंडी मारली... आणि अवघ्या 24 तासात राज ठाकरेंचा ताफा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानाकडे वळला...बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत तासभर चर्चा केलीय.. या भेटीच्या टायमिंगने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात....मात्र गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी भेट घेतली असेल असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावलाय.

अजित पवारांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा दाखला देत भेटीचे राजकीय अर्थ काढू नये, असं म्हटलंय..

राज ठाकरेंनी मात्र फडणवीसांच्या भेटीमागे काहीही राजकीय अजेंडा नसून ही भेट टाऊन प्लॅनिंगसंदर्भातील असल्याचा खुलासा केलाय...

वाजत गाजत एकत्र आलेला ठाकरे ब्रँड बेस्ट निवडणुकीत फेल ठरल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतलीय

त्यामुळे या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत...

बेस्टमधील पराभवानंतर ठाकरे ब्रँड फेल ठरल्याच्या चर्चांना छेद देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलाय.. त्याबरोबरच फडणवीसांची भेट घेऊन आपलं महत्व कायम असल्याचं अधोरेखित केलंय.. दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आणि भाजपचा पर्याय खुला असल्याचे संकेत या भेटीतून देण्यात आलेत..

खरंतर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरु असताना राज ठाकरे आणि फडणवीसांची ही पहिलीच भेट नाही...याआधी ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी झाल्या आहेत...

महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 12 फेब्रुवारीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली.. तर हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर 13 जूनला राज ठाकरे आणि फडणवीसांची वांद्र्यातील हॉटेलमध्ये भेट झाली...त्यानंतर आता टाऊन प्लॅनिंगचं कारण देत राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतलीय...

राजकारणात टायमिंग महत्वाचं.म्हणून बेस्टची निवडणूक हा छोटा विषय आहे असं जरी राज ठाकरेंनी म्हटलं असलं आणि टाऊन प्लॅनिंगच कारण जरी सांगितलं असलं तरी या भेटीच्या टायमिंगच काय..? मग चर्चा तर होणारच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

पालघरमध्ये मोठी राजकीय घडामोड! एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT