Raj Thackeray meets CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow Saam TV Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे भल्या सकाळी थेट 'वर्षा' बंगल्यावर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

Raj Thackeray meets CM Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर अचानक भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ganesh Kavade

Raj Thackeray news today, Raj Thackeray Fadnavis meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भल्या सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ दिला. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे राज्य सरकारवर अत्यंत आक्रमकपणे टीका करत असतानाच ही सरप्राइज भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

भेटीमागचे कारण काय?

दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली किंवा ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मागील काही दिवसांत राज ठाकरे यांनी सरकारवर अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते.

मुद्यांवरून सरकारवर टीका:

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे, जेन-जी (Gen Z) आंदोलन आणि नाशिक दौऱ्यादरम्यान कुंभमेळ्याच्या नियोजनावरून ठाकरेंनी सरकारवर थेट निशाणा साधला होता.

चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न? या पार्श्वभूमीवर, महामार्ग आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी राज ठाकरे भेटायला गेल्याचा एक तर्क लावला जात आहे.

अजिंक्य नाईक यांच्या उपस्थितीने नवी चर्चा

या भेटीदरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क मैदानाच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे नवीन स्टेडियम उभारणीबाबत किंवा शिवाजी पार्क मैदानाच्या विकासाबाबत कोणताही विशेष प्लॅन घेऊन ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे गेले होते का? अशीही चर्चा रंगू लागली आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून, लवकरच या भेटीचे मुख्य कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंतरवाली सराटीत मराठा बांधवांसाठी तब्बल तीन क्विंटलची दाळबाटी

Police Suspended: ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ

23 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; CM कार्यालयात मोठे फेरबदल, कोणाची कुठे नियुक्ती?

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT